करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
आभार प्रकाशित कुलवृत्तांत संपादकीय निवेदन  
कुलवृत्ताचे प्रयोजन- 1  2  3  4           
 

इतके सर्व करुन सुध्दा त्यालाफ़ारसा प्रातिसाद मिळाला नाही काही वेळा ४०/५० फ़ॉर्मस करमरकर कुटुंबियांना नेले परंतु परत भरुन मात्र २ टक्के सुध्दा आले नाहीत अशा वेळी नाउमेद होण्याची वेळ येते अशा स्थितीत थांबणे म्हणजे आत्मघात असतो त्यावर मात करण्यासाठी नवीन उपाय योजना करणे क्रमप्राप्त होते त्या उपाय योजनेचा एक भाग म्हणुन परत फ़ॉर्म पाठवुन स्मरणपत्र धाडणे परतु दुदैवाने या गोष्टीला सुध्दा प्रातिसाद मिळाला नाही. नंतर राहिला केवळ एकच उपाय तो म्हणजे प्रत्यक्ष भेटुन फ़ॉर्म भरुन घेणे त्यासाठीसुध्दा योजनाबध्द कार्यक्रम तयार करणे ओघानेच आले प्रत्यक्ष भेटी घेणे मुबईसारख्या गतीमान शहरात किती कष्टदायक असते हे सर्वांना माहित आहे डोबिंवली किंवा कल्याण शहरी अंधेरी बोरिवलीहुन जाणे किती त्रासदायक व बेभरवशी रेल्वे प्रवासामुळे किती तापदायक होते हे जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही .अशा लांब पल्ल्याची ठिकाणी जाणे म्हणजे ठरविलेले वेळापत्रक थोडे फ़ार बिघडते याची कल्पना असुनसुध्दा काही ठीकाणी ही काय येण्याची वेळ आहे काय? असा प्रश्न करुन स्वागत होते त्या वेळी केवळ सस्थेसाठी अपमान करावा लागतो.परंतु नंतर असे समजले की आपण त्या कुटुंबियाकडे कोणत्याही वेळी गेली तरी हाच प्रश्न विचारला जातो त्यामुळे थोडेसे हायसे वाटले मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या दुरध्वनीची चांगली सोय असल्यामूळे प्रत्यक्ष भेटी आधी दुरध्वनीची चांगली सोय असल्यामुळे प्रत्यक्ष भेटी आधी दुरध्वनीवरुन कल्पना दिली की काम सुकर होते असा अनुभव खरोखरच लाभदायक झाला अर्थांत त्यासाठी वेळ पैसा व कष्ट लागतात व काही वेळा फ़ायदा होईलच याची खात्री नसते परतु एक गोष्ट सातत्याने जाणवली की प्रत्यक्ष भेटी अंती पुष्कळ माहिती मिळते व काही शंका असल्यास ताबडतोब निवारण करता येते तीन चार व्यक्त्ती एकत्रितपणे गेल्यावर त्याचा चांगला प्रभाव पडतो व तेवढ्याच त्या कुटूंबातील व्यक्त्ती फ़ॉर्म भरण्यासाठी मदत करतात व एकमेकांच्या स्मरणशक्त्तीला पुरक ठरतात ठाणे डोबिंवली व कल्याणमध्ये उत्तम प्रातिसाद मिळाला एके ठिकाणी आम्ही कुलवृत्ताचा फ़ॉर्म रिक्षा मध्ये भरुन घेतला रिक्षाचालक करमरकरच होता व त्याच्या घरी जाणे वेळेभावी शक्य नव्हते
संकलनासाठी उपाय योजणे व त्याची कृती करणे त्यासाठी कार्यकारिणीचे सभासद व निमंत्रित याच्या वारंवार बैठका झाल्या व त्या बैठका शक्यतो रविवारी सोडुन घेतल्या जात असत. कारण रविवार संपर्कासाठी राखून ठेवलेला असे.त्या बैठकीत सर्वतोपरी विचार करुन पुढील कार्यक्रम ठरविला जात असे व दुरध्वनीवरुन संपर्क साधला जात असे
आज पाहिल्या आवृत्तीत २००ते २२० करमरकर कुटूबियांची माहिती संकलित केली आहे त्यासाठी ब-याच सभासदाचे योगदान मिळाले काहीचा उल्लेख करणे व्यर्थ ठरणार नाही.
श्री श्याम रघुनाथ करमरकर
श्यामजी खार- मुंबई
१९७७ साली झालेल्या स्नेहसभेच्या वेळी फ़क्त्त संकल्प सोडला होता परंतु नुसता संकल्प सोडुन चालत नाही त्याचा पाठपुरावा करावा लागतो अत्यत कार्यमग्न पारिस्थितीत सुद्धा त्यांनी या कार्यकारिता ब-याच वेळा आपल्या घरी व कार्यालयात बैठका घेतल्या सुसूत्र कार्यपध्दती व सतत पाठ पूरवठा त्यामूळे हे कार्य पूर्ण त्वाला आले संकलना पूढील कार्य हे फ़ारच अवघड आहे , त्याची सर्व जबाबदारी श्यामजींनी स्व:तवर घेतली. वरील सर्व गोष्टीमुळे ख-या अर्थांने या कुलवृत्ताचे ते शिल्पकार आहेत ह्या सर्व प्रकल्पामध्ये त्यांच्या कुटूबियांचाही मोठा सहभाग आहे. श्री दत्तात्रय नागेश करमरकर - अंधेरी ,
मुंबई

मागे पुढे           
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+